Friday 8 January 2016

शब्दमेळ

नमस्कार मित्रांनो..

आज माझा ब्लॉग विश्वात 'शब्दमेळ' च्या माध्यमातून पहिलाच दिवस! या तश्या जुन्या पण माझ्यासाठी नव्या माध्यमातून संवाद साधण्याचा साधा प्रयत्न.तसा हां एकतर्फीच संवाद :) परंतु यातुन कदाचित माझा बोलघेवडेपणा वाढत जाईल आणि तसतसे या प्रवासातील माझे सोबतीही वाढत जातील अशी अपेक्षा!
         मला लिहायला आवडतं..चांगल,दर्जेदार वाचन हेही माझ्या छंदापैकी एक.जुन्या म्हणजेच अर्थपुर्ण संगीताचा आणि गाण्यांचा निस्सीम चाहता,आणि हो सगळ्यात महत्वाचं सर्व मराठी बांधवांप्रमाणे मी ही आहे माझ्या 'मायमराठी' चा भक्त🙏

                  "कसे होऊ उतराई?
                   मायमराठी अपुलि आई!
                   जन्मदात्रीने जग दाखविले
                   मायमराठीने जग शिकविले"

आराध्य श्रीगणेशाला वंदन आणि मायमराठीला नमन करून हां प्रवास सुरु करुया.धन्यवाद.

No comments:

Post a Comment