कसं जमतं
सर्वांना जगणं?
थोडया रिक्त जागा
काही अवघड प्रश्न,
चाळली जातात
आयुष्याची पाने,
कुणी गद्यात दंग
कुणी काव्यात मग्न!
जीवनाचा माग
घेणेच व्यर्थ
अपुलीच वाट
अपुलेच स्वार्थ,
इथे प्रत्येकाचे
वेगळे तराने,
कुणी गाती निमूट
कुणी शोधती अर्थ!
- अनुप अशोक पवार
22-01-2016